हजारच्या 10 कोटी नोटा चुकीच्या छापल्या

नाशिकच्या नोट प्रेसचा भोंगळ कारभार उघड झालाय. एक हजाराच्या दहा कोटी नोटा चुकीच्या पद्धतीनं छापल्याचं समोर आलंय. दोन चार नव्हे तर चक्क हजारच्या दहा कोटी नोटांमध्ये सुरक्षा तारच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Jan 12, 2016, 08:45 PM IST
हजारच्या 10 कोटी नोटा चुकीच्या छापल्या title=

नाशिक : नाशिकच्या नोट प्रेसचा भोंगळ कारभार उघड झालाय. एक हजाराच्या दहा कोटी नोटा चुकीच्या पद्धतीनं छापल्याचं समोर आलंय. दोन चार नव्हे तर चक्क हजारच्या दहा कोटी नोटांमध्ये सुरक्षा तारच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून अशा हजाराच्या नोटा छापल्या गेल्याने संपूर्ण देशाच्या आर्थिक सुरक्षेच धिंडवडे निघाले आहेत. एका कागदावर नऊ उणे चार अशा पद्धतीने नोटांची छपाई करण्यात येते. त्यातील एका ओळीत ही तार टाकण्यात आलेली नव्हती.

ज्या कंपनीकडून हा कागद घेतला त्याची कुठलीही तपासणी न करता नोटा छापण्यात आल्या आणि थेट रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आल्या. मात्र या भोंगळ कारभारामुळं बँकेवर या सर्व नोटा परत मागवण्याची नामुष्की ओढवलीय. यामुळं मात्र नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या लौकिकावर काळिमा फासला गेला आहे.