स्टॅम्प पेपर हद्दपारीला विक्रेत्यांचा विरोध

नागपुरात स्टॅम्प पेपरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 7, 2013, 06:39 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपुरात स्टॅम्प पेपरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस विविध कामांसाठी स्टॅम्प पेपरची मागणी वाढली असताना अचानक आलेल्या या तुटवड्यामुळे आता स्टेम्प पेपरची काळाबाजारी होत असल्याचा आरोप होतोय.राज्य सरकारने स्टॅम्प पेपरऐवजी बँकेतून ही सेवा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वसामन्यांनी स्वागत केले असून यामुळे स्टॅम्प पेपरच्या काळाबाजारापासून आपल्याला मुक्ती मिळेल असा विश्वासही व्यक्त केलाय. मात्र स्टॅम्प पेपर विक्रेत्यांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय.

दरम्यान स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पूर्व पदावर येण्यास थोडा वेळ लागणार असल्याचं स्थानिक शासकीय अधिका-यांनी सांगितलंय.