नितीन गडकरी यांचा केजरीवाल यांना टोला

मला निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.

Updated: Feb 3, 2014, 10:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मला निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांच्या यादीत नितीन गडकरी यांचे ही नाव घेतले होते, गडकरींनी देखील त्यांचे नाव न घेता केजरीवालवर ही टीका केली आहे.
नितीन गडकरी हे नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, त्यासाठी आज बूथ संकल्प महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गडकरी बोलत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.