www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
विधानपरिषदेत आज जादूटोणाविरोधी विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कालच विधानपरिषदेत मांडण्यात आलंय. या विधेयकातल्या तरतूदींना शिवसेना-भाजपचा विरोध आहे. तरी हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आज या विधेयकावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
जादूटोणा विरोधी विधेयक अंतिम मंजुरीसाठी विधान परिषदेत सादर झाले असून, त्यावरील चर्चा सुरू आहे. आज हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे से विरोधी पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी सांगीतलंय.. दरम्यान या विधेयकासाठी आग्रही असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.
दरम्यान आपल्या वडिलांवर लावला जात असलेला हा आरोप खोडसाळ असल्याचा दावा हमीद दाभोलकरने केला आहे. आपले वडील नरेंद्र दाभोलकर यांना अमेरिकेच्या मराठी फाउंडेशन तर्फे पुरस्कार मिळाले होते आणि ती पुरस्काराची रक्कम त्यांनी संस्थेला दिल्याचा दावा देखील त्यांचे पुत्र हमीदने केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.