मान्सूनवर कोट्यवधींचा सट्टा

देशातल्या सट्टेबाजांनाही मान्सूनचे वेध लागलेत. यंदा मान्सून किती बरसरणार इथपासून तर तो मुंबई आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार यावर कोट्यवधींचा सट्टा लागलाय. 

Updated: Jun 8, 2016, 10:40 PM IST
मान्सूनवर कोट्यवधींचा सट्टा title=

मुंबई : देशातल्या सट्टेबाजांनाही मान्सूनचे वेध लागलेत. यंदा मान्सून किती बरसरणार इथपासून तर तो मुंबई आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार यावर कोट्यवधींचा सट्टा लागलाय. 

यंदा सरसरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय..सट्टेबाजांनाही हीच शक्यता अधिक वाटतेंय. तर येत्या १० तारखेला मुंबईत मान्सूनच्या धारा बरसतील असा सट्टे बाजांना वाटतंय.

आठ दिवस उशिरा का होईना, अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. हवामान खात्यानं ही मान्सूनच्या या वर्दीला दुजोरा दिलाय. केरळच्या मुन्नारपर्यंत मान्सूनच्या पावसानं धडक दिली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरु झालाय.

मान्सूनच्या प्रगतीचा वेगही उत्तम असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. सध्याच्या परिस्थितीनुसार उद्या कर्नाटकात दाखल होईल आणि त्यानंतर अगदी काही तासांमध्येच सारा महाराष्ट्र ज्याची वाट बघतोय, तो पाऊस कोकणच्या किनाऱ्यावर बरसेल असा अंदाज आहे. मान्सूनची वाटचाल उत्तर दिशेनं उत्तम गतीनं सुरू असल्याचंही वेधशाळेनं स्पष्ट केलंय.