www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबई बलात्कार प्रकरणातल्या पाच आरोपींविरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीय. एका महिलेनं शक्ती मिलमध्येच ३१ जुलैला आपल्यावर गँगरेप झाल्याची तक्रार दाखल केलीय. ना. म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलीनं गँगरेपप्रकरणातल्या तीन आरोपींना ओळखलंय.
शक्ती मिल कंपाऊंडमधील महिला फोटोग्राफरवरील गँगरेप प्रकरणानंतर शक्ती मिल कंपाऊंडमध्येच आपल्यावरही ३१ जुलैला गँगरेप झाल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. आज सकाळी भांडूप पोलीस ठाण्यात तिनं तक्रार दाखल केलीय.
या आरोपींनीच आपल्यावर ३१ जुलैला बलात्कार केल्याचा आरोप करत पाच आरोपींपैकी तीन जणांना महिलेनं ओळखलंय. या महिलेची तक्रार एन.एम.जोशी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलीय.
२२ ऑगस्टला मुंबई गँगरेपची घटना घडल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. तेव्हा चौकशीनंतर आरोपींना आणखीही दोन महिलांवर बलात्कार केल्याचं याआधी पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ