मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर आजपासून वायफाय सुरु

प्रवाशांना मोबाईलवर जलद आणि मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोयीची ठरणारी वाय-फाय सेवा मुंबई सेंट्रल स्थानकात आजपासून सुरु होत आहे.

Updated: Jan 22, 2016, 08:29 AM IST
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर आजपासून वायफाय सुरु title=

मुंबई : प्रवाशांना मोबाईलवर जलद आणि मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोयीची ठरणारी वाय-फाय सेवा मुंबई सेंट्रल स्थानकात आजपासून सुरु होत आहे.

या सेवेचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. देशातील 400 स्टेशनवर गुगलच्या सहाय्याने वाय-फाय सेवा देण्यात येणार असून या वाय-फाय सेवाचा पहिला मान मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळालाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौ-यावर असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील गुगलच्या मख्यालयाला भेट दिली होती. आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चाही केली होती. 

यावेळी पिचाई यांनी डिजिटल इंडियाच्या योजनेनुसार भारतातील 400 स्थानकांवर उच्च दर्जाची वाय-फाय सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. यात सुरुवातीला सर्वात व्यस्त अशा रेल्वेच्या 100 स्थानकांनवर वायफाय सेवा सुरु करण्याचं ठरलं होतं. त्याचा पहिला मान मुंबई  सेंट्रल स्थानकाला मिळालाय.