मुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात

मुली प्रेमात पडल्या की खालील बदल त्याच्या स्वभावात दिसून येतात.

Updated: Sep 4, 2016, 09:31 PM IST
मुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात title=

मुंबई : मुली प्रेमात पडल्या की खालील बदल त्याच्या स्वभावात दिसून येतात.

मुलींच्या बाबतीत प्रेमात पडल्यानंतर काही बदल लगेच जाणवतात. प्रेमात पडल्यानंतर कोणी इमोशनल होतो, समजदार होतो किंवा एखादा नवीनच बदल जाणवू लागतो.

रात्री फोनवर बोलणं, 'त्या'चा तासन् तास विचार करणं किंवा मेसेजवर बोलणं यामध्ये रात्र कधी जाते ते अनेकदा कळतच नाही. प्रेमात पडल्यानंतर मुलींची झोप कमी होते. 

 वारंवार आरशासमोर जाऊन मनात हसणं, चेहऱ्याची खास काळजी घेणं हे बदल मुलींमध्ये जाणवतात. प्रत्येक मुलगी स्वतःला सुंदरच मानते मात्र प्रेमात पडल्यानंतर यामध्ये जास्त बदल होतो.

अनेक मुली इतरांना मोबाईलला हात लावून देत नाहीत किंवा सारखं सारखं मोबाईलकडं पाहण्याची सवय लागते.प्रेमात पडल्यानंतर मुलींचा मोबाईल हा टॉप सिक्रेट बनतो. 

मुलींना प्रेमात पडल्यानंतर रोमँटीक आणि प्रेमाचे गाणे आवडतात. यापूर्वी एकेकाळी प्रेमकथांवर विश्वास न ठेवणाऱ्या मुलींमध्य़ेही हा बदल दिसून येतो. 

बॉयफ्रेंडला भेटायचं असल्यास मुली कपड्यांच्या बाबतीत चांगल्याच सजग असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडला आवडणारेच कपडे घालणं मुली पंसत करतात. प्रेमात पडल्यानंतर मुलींची पसंत ही बॉयफ्रेंडचीही पसंत बनते.