वडाळा ते लोअर परळदरम्यान लवकरच धावणार 'मोनो'

लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परळदरम्यान सुरु होणारी मोनो लवकरच धावताना दिसेल. वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ताशी 15 किमी वेगाने ही चाचणी घेण्यात आली.

Updated: Sep 11, 2016, 08:11 AM IST
वडाळा ते लोअर परळदरम्यान लवकरच धावणार 'मोनो' title=

मुंबई : लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परळदरम्यान सुरु होणारी मोनो लवकरच धावताना दिसेल. वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ताशी 15 किमी वेगाने ही चाचणी घेण्यात आली.

मोनोचे अंतिम स्थानक संत गाडगे महाराज स्थानक लोअर परेल स्टेशनपासून 1200 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे लोकल स्टेशनला लागूनच लोअर परेल स्टेशनही असणार आहे. वडाळा डेपो, जीटीबी नगर, अॅन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी आणि लोअर परेल या स्थानकांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली.