तुम्हीच करा, मतदार यादी अद्यावत!

तुमचे मतदार यादीत नाव नाही. किंवा नाव नोंदवूनही तुमचे मतदान कार्ड मिळाले नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हीच तुमची माहिती आता मतदार यादीत समाविष्ट किंवा अद्यावत करू शकता. तेही घरबसल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2013, 11:08 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
तुमचे मतदार यादीत नाव नाही. किंवा नाव नोंदवूनही तुमचे मतदान कार्ड मिळाले नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हीच तुमची माहिती आता मतदार यादीत समाविष्ट किंवा अद्यावत करू शकता. तेही घरबसल्या.
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवणे, पत्त्यात बदल करणे, फोटो अपलोड करणे आदी कामे मतदाराला करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही नावनोंदणी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करू शकता. १ ऑक्टोबरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी मतदार यादी अद्यावत करण्यातबाबत हिरवा कंदील दाखविला. मतदार यादीबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुढाकरा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आजी-माजी आमदार-खासदारांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटले. यावेळी निवडणूक उपायुक्त डॉ. अशोक शुक्ला, सुधीर त्रिपाठी आणि आयोगाचे कायदेविषयक सल्लागार एक. के. मेदिदथा यांच्याशीही चर्चा केली.
मुंबईत मतदार यादीतून मतदारांची नावे कमी करण्यात आल्याची बाब भाजपने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. या तक्रारींची दखल घेत आयोगाने स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिलेय.

मानखुर्दमधून ७८० तर घाटकोपर , बोरिवली , मुलुंडच्या याद्यांतून तब्बल २० हजार नावे १ जानेवारी, २०१३ रोजी कमी करण्यात आली. ही बाब या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. याच विषयाची दखल घेताना निवडणूक आयुक्तांनी यापुढे मतदार याद्यांमध्ये कोणत्याही माहितीत बदल करावयाचा झाल्यास सर्व नागरिकांना ऑनलाइन करता येईल, अशी माहिती दिली. तर मतदार यादीतील नावांचे डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन करण्याचे काम पुन्हा करण्यात येणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.