www.24taas.comमुंबई
विद्याविहार स्थानकाजवळील नटराज हॉटेलमध्ये तिघांची शनिवारी गुढरीत्या हत्या कण्यात आली होती. या हत्येमागील गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सोनू उर्फ प्रदीप सोनावणे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
तिहेरी हत्याकांड चिडवाचिडवीवरून घडल्याची धक्कादायक माहिती प्रदीप याच्या चौकशीतून पुढे आली. तिघांची हत्या केल्यानंतर कुठे जावे, काय करावे, या संभ्रमात गिरगाव चौपाटीवर फिरताना पोलिसांनी प्रदीपला अटक केली.
हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा रात्री अडीचच्या सुमारास बंद झाल्यानंतर या तिघांची हत्या करण्यात आली. सुरक्षारक्षकाचा मृतदेह गेटजवळ तर दोघांचा मृतदेह मागच्या बाजूला असणा-या गॅरेजमध्ये आढळला. सकाळी हॉटेलमध्ये साफसफाई करणा-या कर्मचा-याला तिघेही रक्ताच्या थारोळ्यात आढळले. या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालक आणि कर्मचा-यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर हत्येमागील गुढ उकलण्यास मदत, झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
यवतमाळमधील एका गावातून प्रदीप मुंबईत नोकरीला आला. महिनाभरापूर्वीच नटराज बारमध्ये तो नोकरीला लागला. तेव्हापासून त्याला तिघे उंची आणि रंगरूपावरून चिडवित होते. चिडवू नका, मला राग येतो, अशी समजूत काढल्यावर तर या तिघांचा त्रास आणखी वाढला. त्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.