www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.
मुंबईत मेट्रोचं तिकीट महिनाभरासाठी फक्त दहा रुपये राहणार आहे. रिलायन्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आलीय. मात्र मेट्रोचे दर ठरवण्याचे अधिकार मेट्रो प्राधिकरणाकडेच असल्यानं आगामी काळात हे दर वाढण्याचे शक्यता आहे.
मेट्रो रेल्वेच्या उदघाटनावरून आता राजकारण सुरू झालंय. रिलायन्सनं दरवाढ करण्याचा घाट घातलाय. मात्र तो शासनाला मान्य नाही. जर मेट्रो सुरू करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो भाडेवाढीला रिलायन्स मदत करत असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केलाय.
इतके दिवस जी येणार. येणार म्हणून सगळे मुंबईकर वाट पहात होते, ती मेट्रो उद्यापासून खरंच मुंबईत धावणार आहे. उद्या सकाळी दहा वाजता मेट्रोचं उदघाटन होणारेय. तशी घोषणा मेट्रोच्या सीईओंनीच केलीय. वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्या टप्प्यावर ही मेट्रो धावणार आहे. दिवसाला मेट्रोच्या साधारण 200 ते 250 फे-या होणं अपेक्षित आहे. मेट्रोचं कमाल भाडं 10 तर किमान भाडं 40 रुपये असणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या मंजूरीनंतर मुंबई मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. गेले अनेक दिवस मुंबईकरांना मोठी प्रतिक्षा असणारी मेट्रो अखेर सुरू होतेय. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रोला रेल मंत्रालयानं गुरूवारी हिरवा झेंडा दाखवला. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दररोज 11 लाख प्रवासी प्रवास करू शकतील. साडे 11 किमी अंतर 21 मिनिटांत पार करता येईल. वर्सोवा-घाटकोपर प्रवासादरम्यान एक तासाचा वेळ तर वाचणार आहे. शिवाय लोकल ट्रेनच्या तुलनतेत मेट्रोत एसीमधून प्रवास थंडगार आणि अधिक आरामदायक प्रवास होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.