www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
भांडुपमधील भाजप कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या हत्येप्रकरणी बबन तुकाराम खोपडे या संशयिताला अटक करण्यात आली आहे. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अससेसे वसंत पाटील हे आरटीआय कार्यकर्तेही होते.
भांडूपमधल्या वनजमिनींवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांची पोलखोल त्यांनी माहितीच्या अधिकारातून उघड करण्याचा विडा उचलला होता. त्यामुळं त्यांच्या हत्येमागे भूखंड माफिया असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
यापूर्वी याच विभागातल्या संजय पगारे या आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. वसंत पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर हत्येचा आरोप केलाय.
पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून चार हजार चौरसमीटरचा शासकीय भूखंड हडपणार्या माजी शिवसेना नगरसेवक सुरेश शिंदे यांचा भांडाफोड केला. पाटील यांनी केलेल्या तक्रारी आणि पाठपुराव्यामुळे भांडुप पोलिसांना शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.
टेंभीपाडा येथील निवासस्थानी सकाळी सातच्या सुमारास अज्ञात मारेकर्यांनी हत्या केली. घरात घुसलेल्या पाच ते सहा मारेकर्यांनी पाटील यांच्यावर चॉपर, तलवारीचे तब्बल ३५ वार केले. पाटील यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्यात आली असावी. त्यामागे भांडुपमधील गुंड-माफिया-राजकारणी-पोलीस ही अभद्र युती असावी, असा दाट संशय त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.