दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं असल्याचा टोला उद्धव ठाकरेनी लगावलाय. ३५ वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जातांना
अजित पवारांना धरणाच्या ठिकाणी घेऊन जावू नका, असा सल्लाही त्यांनी शरद पवारांना दिला.
मुंबईत मार्मिक साप्ताहिकाचा ५५वा वर्धापन दिन उत्साहात झाला. या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
तसंच उंटावरून शेळ्या आखणारे खूप आहेत, मैदानात येऊन ते काम करत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- उद्धव ठाकरेंचं भाषण, मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा
- उंटावरून शेळ्या आखणारे खूप आहेत, स्वत: इतिहास घडवत नाहीत
- शिवसेना चांगलं काम करतेय, मार्मिकनं इतिहास घडवला- उद्धव
- मुंबई मिळाली नाही तर मराठी माणसाने ती मिऴविली आहे - उद्धव ठाकरे
- रिकाम्या डबड्यांना खडखडाट, काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
- शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार आहेत, त्यांच्या सरकारमुळेच आताची वेळ आलीय
- सिंचन प्रकल्प कसे अर्धवट ठेवलेत, पैसे कुणी गिळले ते पाहा
- अजित पवारांना धरणाच्या ठिकाणी घेऊन जावू नका, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सल्ला
- देशात सध्या सर्वत्र बिनकामाच्या चर्चाच सुरु आहेत, दुष्काळाची शरद पवारांना ३५ वर्षांनी जाग आली असून पवारांच्या पापांनीच सिंचनाचं मातेरं केलं - उध्दव ठाकरे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.