सेल्फीच्या नादात बँड स्टँडजवळील समुद्रात दोन बुडाले

हल्ली सेल्फीची क्रेझ भयंकर वाढलीय. जळी स्थळी जो तो सेल्फी काढण्यात मग्न असतो. मात्र या सेल्फीच्या नादात अनेक असे अपघातही घडतात ज्यामुळे जीवही जातो. 

Updated: Jan 9, 2016, 02:28 PM IST
सेल्फीच्या नादात बँड स्टँडजवळील समुद्रात दोन बुडाले title=

मुंबई : हल्ली सेल्फीची क्रेझ भयंकर वाढलीय. जळी स्थळी जो तो सेल्फी काढण्यात मग्न असतो. मात्र या सेल्फीच्या नादात अनेक असे अपघातही घडतात ज्यामुळे जीवही जातो. 

सेल्फीचा हा नाद मुंबईतल्या तीन तरुणीच्या अंगाशी आलाय. मुंबईतल्या बँडस्टँडजवळ सेल्फी काढताना पाय घसरुन तीन तरुणी समुद्रात बुडाल्यात. 

स्थानिक तरुणानं या तीन तरुणींना वाचवण्यासाठी समुद्रात उडी टाकली. या तरुणानं तीन पैकी दोन मुलींना वाचवलंय. मात्र आता हा तरुण आणि एक तरुणी बेपत्ता झालेत. त्यापैकी मुलीचा मृत्यू झालाय. तर तरुणाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.