व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दोन पत्नींच्या पतीची आत्महत्या!

दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या सुनिलनं चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली... आणि आपल्या मुलाचा छताला लटकलेला मृतदेह पाहून सुनिलच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही हृदयद्रावक घडना मुंबईत घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2013, 02:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या सुनिलनं चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली... आणि आपल्या मुलाचा छताला लटकलेला मृतदेह पाहून सुनिलच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही हृदयद्रावक घडना मुंबईत घडलीय.
आग्रीपाड्यात राहणाऱ्या सुनिल उघडे या ३२ वर्षीय इसमानं आपल्या दोन पत्नींमुळे झालेल्या मानसिक ताणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. १९ वर्षांपूर्वी एका ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या सुनिलचा विवाह अनुराधा हिच्याशी झाला होता. या जोडप्याला तीन मुलंही आहेत. मात्र, सात वर्षांपूर्वी अनुराधानं धोबीघाट भागात राहणाऱ्या अब्दुल्ला शेख नावाच्या इसमाबरोबर बस्तान बांधलं... त्यानंतर सुनीलनं नंदिनी नावाच्या तरुणीशी दुसरं लग्न केलं. पण, त्यानंतरही अनुराधाचं त्यानंतरही सुनिलच्या घरी येणं-जाणं सुरूच राहीलं.
सुनिलची पहिली पत्नी आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळी करते, हे नंदिनीला खटकत होतं. त्यामुळे ती घर सोडून गेली. दुसरी पत्नीही सोडून गेल्यानंतर मात्र सुनीलला मानसिक त्रास सहन झाला नाही. ‘पहिल्या बायकोच्या परपुरुषाशी संबंध असूनही तीनं दिलेल्या त्रासामुळे पहिली पत्नी सोडून गेली.. आता जगायचं तरी कुणासाठी’ असा प्रश्न विचारणारा १८ मिनिटांचा व्हिडिओ सुनीलनं रेकॉर्ड केला आणि आत्महत्या केली.
सुनीलच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीत आपण मोबाईलमध्ये आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, अशी चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. त्यानंतर या आत्महत्येमागचं गूढ पोलिसांना उलगडलं. सुनिलच्या आईनेच सर्वात आधी घरात सुनीलचा मृतदेह लटकलेला पाहिला होता आणि पोलिसांशी संपर्क केला होता.

या व्हिडिओच्या आधारे सुनीलच्या मृत्यूला जबाबदार धरून त्याची पहिली पत्नी अनुराधा आणि तिचा प्रियकर अब्दुल्ला शेख (३८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवर आयपीसी कलम ३०६, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.