मुंबई : मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसबाहेर आज २ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादवरून आलेला दिलीप तुळशीराम मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, मोरे यांच्या पुतण्याची २०११ साली हत्या झाली, पण पोलिसांनी आत्महत्या म्हणूनच ही केस नोंदवून घेतल्याचा आरोप मोरे यांचा आहे.
मोरे यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तपासासाठी त्यांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील काहीतरी पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने जी टी रुग्णालयात नेण्यात आले.
दुसऱ्या एका घटनेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या जवळ एका व्यक्तीच्या बॅग मध्ये काहीतरी संशयास्पद सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.