तुकाराम मुंढे बॅक... डी वाय पाटील संकुलातील इमारतीची परवानगी रद्द

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनियमित सुरु असलेल्या कामावर बडगा उभारला आहे. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात नऊ मजली बांधण्यात येणाऱ्या इमारतीची बांधकाम परवानगी नवी मुंबई महानगर पालिकेने रद्द केली आहे.

Updated: Oct 28, 2016, 06:33 PM IST
तुकाराम मुंढे बॅक... डी वाय पाटील संकुलातील इमारतीची परवानगी रद्द title=

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनियमित सुरु असलेल्या कामावर बडगा उभारला आहे. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात नऊ मजली बांधण्यात येणाऱ्या इमारतीची बांधकाम परवानगी नवी मुंबई महानगर पालिकेने रद्द केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने नेरूळ सेक्टर- 7 मधील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलात बांधण्यात येणारी तळमजला अधिक नऊ मजली इमारेतीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे. या इमारतीचे तीन मजल्यांपर्यंत बांधकाम पूर्ण होत आलंय. या इमारतीला 500 वाहनाचे वाहनतळ बांधकाम परवानगीमध्ये दाखवण्यात आले आहे. इमारत भूखंड क्रमांक १ मध्ये असून वाहनतळ तळमजल्यावर न ठेवता भूखंड क्रमांक 2 मध्ये मागण्यात आलंय. 

परंतु तेथे लॉन बांधण्यात आले असून झाडे असल्यानं तिथं पार्किंग होऊ शकत नाही यामुळे, परवानगी क्रमांक 19 आणि 28 चा भंग केल्याप्रकरणी 21 ऑक्टोबरला याबाबत पालिकेने सुनावणी केली होती. त्यानंतर 26 ऑक्टोबरला पालिका नगररचना विभागाने बांधकाम परवाना रद्द केला, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिलीय. 

याबाबत डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाशी संपर्क साधला असता, त्यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही.

शैक्षणिक क्षेत्रात मोठे प्रस्त मानले जाणाऱ्या डॉ, डी वाय पाटील संकुलामधील इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलंय. नवी मुंबई महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाने हा परवाना रद्द केल्यानं मोठे संस्था करत असलेल्या अनियमित कामांना चांगलाच चाप बसणार आहे.