किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

Updated: Oct 5, 2016, 03:26 PM IST
किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर title=

मुंबई : खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी तोंडाला टाळे लावून गप्प बसावे, त्यांनी आपल्या पक्षात काय चाललंय ते पहावे असं सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सोमय्यांवर पलटवार केला आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर शिवसेनेला बदनाम, खच्चीकरण करण्याचा किरीट सोमय्यांकडून प्रयत्न होत असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना एक कुटुंबच आहे आणि कामाचे सर्व प्रस्ताव पास करताना भाजप आमच्या सोबतच होती, तेव्हा का नाही विरोध केला. उलट महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहल्यानंतरच रस्ते भ्रष्टाचार समोर आला असा उलट प्रश्न त्यांनी सोमय्यांना केला आहे. 

प्रभाग पुनर्रचनेनंतर शिवसेनेला काहीच फरक पडत नसल्याचे पाहूनच घाबरलेल्या भाजपकडून सेनेवर आरोप केले जातायत असं देखील तृष्णा विश्वासराव यांनी म्हटलंय.