मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण राज्यात कृषिदिनाचे औचित्य साधून 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता.
राज्यात 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षरोपण झाले होते. राज्यातील जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राच्या वनविभागाने वृक्ष लागवडीसंदर्भात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तसेच आता याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे.
1 जुलै 2016 रोजी वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने, राज्यात 12 तासात लोकसहभागातून 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला.
यादरम्यान राज्यात एकूण 12 तासात 153 प्रकारच्या प्रजातींच्या रोपांची लागवड 65 हजार 674 जागांवर 6 लाख 14 हजार 482 लोकांच्या सहभागातून, 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षाची लागवड झाली होती.