मुंबई : आज २३ जानेवारी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन. यानिमित्तानं शिवाजीपार्कमधल्या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या विचाराचं प्रतिक असलेल्या प्रेरणा ज्योतीचं उदघाटन होणार आहे.
तसंच आज शिवसेनेच्या ताकदीचा लेखाजोखा मांडण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या मार्गदर्शनाकडे साऱ्यांचे लक्ष लगालं आहे.
दरम्यान, बाळासाहेब यांच्यावर काढण्यात आलेल्या 'बाळकडू' या संजय राऊत प्रस्तुत आणि अतुल काळे दिग्दर्शित सिनेमाचा मुंबईत नुकताच प्रिमियर झाला. या प्रिमियर शोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच शिवसेना नेते, कार्यकर्त्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर स्वप्नील जोशी, सुरेश वाडकर अशा कलाकारांनीही आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी उद्धव यांनी भाजप सरकाला इशाराही दिला.
सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, मराठी माणसावर अन्याय झाला तर शिवसेना खासदार, आमदार संधर्ष करतील, असा इशारा दिलाय खुद्द उद्धव ठाकरे यांनी. शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही, आम्ही फक्त सरकार स्थिर केलंय, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.