याआधी कधी-कधी नोटा चलनातून बाद करण्यात आल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा आणि बनावट नोटांचा दहशतवादासाठी होत असलेला 

Updated: Nov 9, 2016, 08:32 PM IST
याआधी कधी-कधी नोटा चलनातून बाद करण्यात आल्या title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा आणि बनावट नोटांचा दहशतवादासाठी होत असलेला 
वापर बंद होणार आहे, यासाठी हा निर्णय क्रांतीकारी म्हटला जात आहे.

यामुळे नरेंद्र मोदी सरकारची मोठी कामगिरी दिसून येईल असं देखील म्हटलं जात आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही की, मोठ्या नोटा बंद करण्यात आल्या.

१) पहिल्यांदा १९४६ मध्ये हजार आणि १० हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या.

२) १९५४ मध्ये हजार, पाच हजार आणि दहा हजार रूपयाच्या नोटा परत चलनातून बाद करत, परत घेण्यात आल्या.

३) यानंतर १९७८ मध्ये या नोटा पुन्हा बंद करण्यात आल्या.

प्रत्येक वेळी नोटा चलनातून बाद करण्यामागे एकच हेतू होता, काळा पैसा बाहेर काढणे.