मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे.
हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
दिवाकर रावते यांच्या घोषणेमुळे रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट सक्ती असली तरी आता पेट्रोल घेण्यासाठीही हेल्मेट असणे आवश्यक आहे.