मुंबई : मुंबई-गोवा मार्गावर सुरु होणारी तेजस एक्स्प्रेस जून अखेरीस धावण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकण आणि गोव्याकडे जाणा-या मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
तेजस एक्स्प्रेस ही अत्याधुनिक असणार आहे. मेट्रोप्रमाणेच या एक्स्प्रेसचे दरवाजे स्वयंचलित असणार आहे. नवीन पद्धतीचे कोचेस असल्याने ही एक्स्प्रेस जलतगतीने धावणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. चहा-कॉफी वेडिंग मशिन्स, एलईडी दिवे, वायफाय, बायोवॅक्युम टॉयलेट अशा विविध सुविधा असणार आहेत.
पाहा व्हिडिओ