एटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!

आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.

Updated: Mar 24, 2014, 12:45 PM IST

www.zee24taas.com झी मीडिया, मुंबई
आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.
मुंबईमध्ये नागरिक दूषित पाण्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. मानखुर्दमध्ये ही समस्या अतिशय तीव्रतेनं जाणवते. म्हणूनच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वंदना फाऊंडेशननं अनोखी एटीएम सुविधा सुरु केलीय.
या एटीएममधून शुद्ध पाणी केवळ एक रुपया प्रतिलीटर प्रमाणे मिळणार आहे. तसेच या एटीएममध्ये दररोज १००० लीटर पाणी मिळण्याची क्षमता आहे.
एटीएममधून पाणी मिळवण्यासाठी प्रीपेड कार्डचा वापर करावा लागेल. हे कार्ड स्वाईप केल्यावर शुद्ध पाणी मिळेल. सध्या या सुविधेचा लाभ मानखुर्दमधील रहिवाशी घेत असून, लवकरच मुंबईमधील दूषित पाण्यावर यामुळं आळा बसेल अशी, माहिती स्वयंसेवी संस्थेनं दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.