फेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी

फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे. 

Updated: Mar 12, 2015, 02:39 PM IST
फेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी title=

मुंबई : फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे. 

अभिषेकला आठ हजारांसाठी ब्लॅकमेल केलं

अभिषेक बोरिवलीत राहत होता, काही दिवसांपूर्वी राजू याने अभिषेकला 'प्रियंका शहा' या नावाने फेसबुकवर फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवली. अभिषेकने ती मान्य केली. त्या दोघांत संभाषण होऊ लागले. १२ फेब्रुवारीला राजूने अभिषेकला 'मी प्रियकांचा भाऊ असून, तू माझ्या बहिणीसोबत अश्‍लील भाषेत बोलतोस' असा आरोप करून आठ हजार रुपयांची मागणी केली. 

राजूच्या अभिषेकला धमक्या

पैसे दिले नाहीस, तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू, असे राजू धमकावू लागला. अभिषेक आठ हजार रुपये जमवू शकला नाही. या चिंतेतच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. 

अभिषेकने १४ फेब्रुवारीला पश्‍चिम रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान लोकलखाली आत्महत्या केली. दादर रेल्वे पोलिसांनी मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील विच्छेदन केंद्रात ठेवला. 

हरवलेल्यांसाठी शोध वेबसाईट

नंतर रेल्वे पोलिसांच्या 'शोध' या वेबसाईटवर अभिषेकचे छायाचित्र अपलोड केले. अभिषेकच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार, बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल केली, यानंतर अभिषेकची ओळख पटली. बोरिवली पोलिसांनी राजूला पनवेल येथून अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.