शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय. 

Updated: Aug 26, 2015, 04:08 PM IST
शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली title=

मुंबई : पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय. 

ड्रायव्हरनं शीनाची हत्या आपण इंद्राणीच्या सांगण्यावरून केल्याचं कबूल केल्यानंतर पोलिसांनी ४३ वर्षीय इंद्राणीला अटक केलीय. त्यानंतर इंद्राणीनं खुनाचा कबुली जबाब देत शीना  ही आपलीच मुलगी असल्याचं कबूल केलंय. 

शीना हिनं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. २०१२ मध्ये जेव्हा शीना मुंबईतून अचानक गायब झाली त्यावेळी ती २४ वर्षांची होती आणि रिलायन्स ADAG कंपनीत कामाला होती. 

अधिक वाचा - हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास

इंद्राणी - मिखाईल इंद्राणीचीच मुलं...  
'टेलिग्राफ'नं दिलेल्या बातमीनुसार, इंद्राणीच्या नातेवाईकांनीही शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचं सांगितलंय. इतकचं नाही तर, इंद्राणीला शीनासोबत आणखी एक मुलगाही - मिखाईल आहे. 'आपला बराच वेळ कोलकाता आणि त्रिपुरामध्ये व्यतीत करणाऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधातून' इंद्राणीला हे दोन अपत्य आहेत. त्यानंतर, इंद्राणीनं अनेकदा कोलकाता आणि जमशेदपूरमध्ये दौरा करणाऱ्या पीटर मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला.

इंद्राणीनं शीनाची बहिण म्हणून करून दिली ओळख
शीना आणि तिचा भाऊ इंद्राणीच्या आई-वडिलांकडेच गुवाहाटीमध्ये लहानाचे मोठे झाले. शीनाचा भाऊ सध्या एका एअरलाईनमध्ये कामाला आहे. शीना आणि तिचा भाऊ जेव्हा मुंबईला शिक्षणासाठी दाखल झाले तेव्हा इंद्राणीनं शीनाची ओळख आपली बहिण म्हणून करून दिली. शीना ही त्यावेळी इंद्राणी आणि पीटरच्याच घरी राहत होती. 

शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत संबंध
'फर्स्टपोस्ट'नं दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीची बहिण म्हणून मुखर्जी यांच्या घरात दाखल झालेल्या शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत (पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा) संबंध जुळले होते.  

अधिक वाचा - हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.