सिद्धिविनायकाचं दर्शन नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे साडेतीनपासून

नववर्षाच्या पहिला दिवशी हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. म्हणूनच उद्या १ जानेवारी २०१४ ला पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 31, 2013, 06:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नववर्षाच्या पहिला दिवशी हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. म्हणूनच उद्या १ जानेवारी २०१४ ला पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येणार आहे.
पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरू झालेलं दर्शन भाविकांची रांग संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरच्या न्यासानं सांगितलंय. ३१ डिसेंबर रोजी मंगळवार असला तरी मंदिर रात्री १२.४० वाजता बंद करण्यात येणार आहे.

दोन्ही चेकपोस्ट बंद करण्यात येणार आहेत. यानंतर पहाटे साडेतीन वाजता पुन्हा दर्शनाची सुरुवात करण्यात येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.