'शिवसेनेच्या मंत्र्यांंचे राजीनामे तयार'

युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 'शिवसेनेत पक्ष प्रमुखांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी जो आदेश दिला त्या निर्णयाचे शिवसैनिक म्हणून पालन केले जाईल. आधी शिवसैनिक नंतर मंत्री' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Updated: Jan 27, 2017, 08:35 AM IST
'शिवसेनेच्या मंत्र्यांंचे राजीनामे तयार' title=

मुंबई : युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 'शिवसेनेत पक्ष प्रमुखांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी जो आदेश दिला त्या निर्णयाचे शिवसैनिक म्हणून पालन केले जाईल. आधी शिवसैनिक नंतर मंत्री' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर युती तोडण्याची अधिकृत घोषणा केली. आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर केलं. 

50 वर्षांच्या वाटचालीत शिवसेनेची 25 वर्षं युतीमध्ये सडली. पण यापुढं युतीसाठी कुणाच्याही दारासमोर कटोरा घेऊन भीक मागणार नाही. शिवसेना एकट्यानं महाराष्ट्रावर भगवा फडकवेल, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या नव्या वाटचालीची घोषणा करताना, शिवसैनिकांना बंडखोरी न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.