मुंबई : हिवाळी अधिवेशनाआधी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आश्वासन भाजपनं मित्रपक्षांना दिलं होतं. मात्र नागपूर अधिवेशन तोंडावर आलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही.
मंत्रिपदासाठी इच्छुक भाजप आमदारांची घालमेल वाढलीय. तर वाट पाहूनी जीव हा शिणला, अशी मित्रपक्षांची अवस्था झालीय. त्यातच केवळ राज्यमंत्रीपदांवर बोळवण करण्यात येणार असल्याने, मित्रपक्षांमधील नाराजी वाढलीय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदिल दाखवलेला नाही. भाजपच्या 5, शिवसेनेच्या 2 तर आरपीआय,
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या मित्रपक्षांना 3 अशी मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र त्यात भाजपच्या तिघांचीच कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. या फॉर्म्युल्यावर मित्रपक्ष नाराज असल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.