मुंबई : शिवसेनेने यावेळीही शिवाजी पार्कमध्ये ध्वनी प्रदुषणाचे नियम धाब्यावर बसवलेत. सभेच्या ठिकाणी आवाज कमी रहावा यासाठी प्रयत्नच केले नाहीत. पोलिसांनीपण याकडे दुर्लक्ष केलं.
सभेच्या वेळी जास्तीत जास्त आवाजाची तीव्रता 98 डेसिबल होती. सुरुवातीच्या वेळी आवाज मोठा होता.. मात्र उद्धव ठाकरे आल्यावर लाउड स्पीकरचा आवाज कमी केला गेला.
आवाज फाऊंडेशन ही सर्व माहिती उच्च न्यायलयाच्या नजरेस देणार आहे.. शिवाय याबातचा अहवाल हायकोर्टाला आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठविणार आहे.