'अभाविप'च्या विरोधानंतर शीतल साठेंचं भाषण रद्द

नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक झालेल्या, सेंट झेविअर्स कॉलेजमधील मल्हार कार्यक्रमात होणार शीतल साठे यांचं भाषण अखेर रद्द करण्यात आलं आहे.

Updated: Aug 15, 2014, 11:00 AM IST
'अभाविप'च्या विरोधानंतर शीतल साठेंचं भाषण रद्द title=

मुंबई: नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक झालेल्या, सेंट झेविअर्स कॉलेजमधील मल्हार कार्यक्रमात होणार शीतल साठे यांचं भाषण अखेर रद्द करण्यात आलं आहे.

अभाविपने केलेल्या विरोधानंतर हे भाषण रद्द करण्यात आलं आहे. शीतल साठे यांचं भाषण रद्द झाल्याने, एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यताय.
 
मल्हार फेस्टीव्हलमध्ये शीतलला जातीयवादाचा अंधकार या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी अभाविप या विद्यार्थी संघटनेनं मुंबईचे आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा हे व्याख्यान रद्द करण्यात आलं.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेनं शीतल साठेच्या निमंत्रणाला जोरदार विरोध दर्शवला आहे. 2013 च्या एप्रिल महिन्यात कबीर कला मंच या संघटनेसाठी काम करणाऱ्या शीतल साठे आणि सचिन माळी या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शीतलला जामीन मंजूर झाला होता.
 
दरम्यान शीतल साठेनं स्वत: या कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मल्हारच्या एका आयोजकानं सांगितलं आहे. शितल साठे आणि सचिन माळी यांचा नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप या दाम्पत्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकऱणी जूनमध्ये शीतल साठेला जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.