मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा मुलगा तन्मय यांचे अपघाती निधन झाले.
तन्मय काल सायंकाळी धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेत. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना निधन झाले. आज सकाळी ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
तन्मय नेहमी दादरमधील मेडिकल स्टोअरमध्ये आपल्या कारमधून जातात. काल गाडी नसल्याने ते रेल्वेतून जात होते. प्रवासादरम्यान, रेल्वेत झोप लागली. रेल्वे पुढे गेल्याचे लक्षात आल्याने धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उडी मारली. यात तन्मय गंभीर जखमी झालेत, अशी माहिती पुढे येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.