मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलीय.
राज्यपाल आणि राज्याचे कुलपती विद्यासागर राव यांनी डॉ. देशमुखांच्या नियुक्तीचं परिपत्रक जारी केलंय. डॉ. संजय देशमुख सध्या मुंबई विद्यापीठाच्या लाईफ सायन्स विभागात प्राध्यापक आहेत.
डॉ. राजन वेळूकरांचा कार्यकाल समाप्त झाल्यावर येत्या सात जुलैला डॉ. देशमुख कार्यभार स्वीकारतील.
डॉ देशमुखांनी पद्व्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मुंबई विद्यापीठातून मिळवलीय. डॉ संजय देशमुख यांना विविध संशोधन प्रकल्पांची आखणी, अंमलबजावणी करण्याचा मोठा अनुभव आहे.
त्यांनी याआधी चेन्नईतल्या एम एस स्वामीनाथन फाऊंडेशनमध्ये प्रमुख म्हणून काम केलंय. त्याचप्रमाणे सागरी किनाऱ्यावरच्या जैवविविधतेविषयी सखोल संशोधन केलंय.
याशिवाय त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीच्या संशोधन विभागाचे संचालक म्हणूनही काम केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.