लहानग्या भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीची आत्महत्या

बालपण म्हणजे भांडण, मस्ती, रुसवा-फुगवा या गोष्टी आल्याच. मात्र या गोष्टी किती टोकाला जाऊ शकतात याचं ताजं उदाहरण मुंबईतल्या गोरेगावात समोर आलं आहे. 

Updated: May 12, 2015, 01:49 PM IST
लहानग्या भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीची आत्महत्या  title=

मुंबई: बालपण म्हणजे भांडण, मस्ती, रुसवा-फुगवा... मात्र, या गोष्टी किती टोकाला जाऊ शकतात याचं ताजं उदाहरण मुंबईतल्या गोरेगावात समोर आलं आहे. 

गोरेगाव येथील आरे कॉलनीत भावा-बहिणींमध्ये झालेल्या भांडणानंतर १२ वर्षांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरातील सगळ्यांना धक्का बसला आहे. 

आत्महत्या केलेल्या मुलीचे कुटुंब उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहे. ती आपल्या मावशीकडे आरे कॉलनीत गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणासाठी राहत होती.

मावशीच्या दोन मुलांसह खेळतांना तिचे भांडण झाले. या भांडणाचा शेवट एक आयुष्य संपवून झालाय. 

भांडण झाल्यानंतर मावशीची दोन मुले तिला चिडवू लागली. यामुळे रागावलेल्या त्यांच्या बहिणीनं आपली ओढणीच खिडकीच्या ग्रिलला लावून घेतली... आणि गळफास लावून घेतला. तिला त्या अवस्थेत पाहून दोन्ही मुले घाबरली. 

त्यानंतर, घरी आलेल्या मुलीच्या काकांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीनं मुलीला हॉस्पीटलमध्ये हलवलं... पण, एव्हाना तिची प्राणज्योत मालवली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.