यादवी सुरु असतानाही सपा लढणार मुंबईची निवडणूक

उत्तरप्रदेशमध्ये यादवी संपत नसतानाच मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष 100 जागा लढवणार असल्याची माहिती सपा आमदार अबु आझमी यांनी दिली.

Updated: Jan 9, 2017, 06:51 PM IST
यादवी सुरु असतानाही सपा लढणार मुंबईची निवडणूक  title=

मुंबई : उत्तरप्रदेशमध्ये यादवी संपत नसतानाच मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष 100 जागा लढवणार असल्याची माहिती सपा आमदार अबु आझमी यांनी दिली. त्यासाठी 24 नगरसेवक उमेदवारांची यादी त्यांनी आज जाहीर केली.

सगळे उमेदवार सायकल या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एमआयएम हा सेक्युलर पक्ष नसून त्यासोबत कधीच जाणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

मुलायम सिंग आणि अखिलेश यांच्या काही लोक जाणूनबुजून वाद निर्माण करू पाहतात. दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची इच्छा यावेळी अबु आझमी यांनी व्यक्त केली.