मुंबई : अभिनेते सचिन पिळगांवकर यांना कमी किंमतीत आलिशान कार देण्याचे अमिष दाखवून ३५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या त्या महिलने पैसे परत केले आहेत. आरोपी महिलेने ३४ लाख रुपये कोर्टात जमा केले असून लवकरच ते सचिन यांना देण्यात येणार आहेत.
पाचगणीत एका कार्यक्रमादरम्यान सचिन यांची या महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेने मुंबई, पुण्यातील कार डिलरशी आपली ओळख असल्याचं सचिन यांना सांगितलं होतं. तसेच कमी किंमतीत आलिशान कार देत असल्याचेही या महिलेने त्यांना सांगितले होते.
महिलेच्या सांगण्यावरुन सचिन यांनी ३५ लाखांची रक्कम त्या महिलेला दिली. मात्र पैसे देऊनही कार न मिळाल्याने सचिन यांनी महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने आपली फसवणूक झाल्याचे सचिन यांच्या लक्षात केले. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अखेर या महिलेने ३४ लाख कोर्टात जमा केले आहेत.