राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहीर

महापालिका निवडणूक डोक्यात ठेवून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई अध्यक्षपदी भाकरी फिरवली. मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांना पुन्हा एकदा संधी देऊन पक्षाची बिघडलेले घडाळाच्या काटे व्यवस्थित करण्याची धडपड करावी लागेल.

Updated: Jul 4, 2015, 07:49 PM IST
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहीर  title=

मुंबई : महापालिका निवडणूक डोक्यात ठेवून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई अध्यक्षपदी भाकरी फिरवली. मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांना पुन्हा एकदा संधी देऊन पक्षाची बिघडलेले घडाळाच्या काटे व्यवस्थित करण्याची धडपड करावी लागेल.

मुंबईत राष्ट्रवादीची परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत अगदीच दयनीय होती. खरंतर मुंबईतल्या मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीनं मुंबईचं अध्यक्षपद संजय दीना पाटलांकडे दिलं. पण मोदींच्या लाटेत पाटील निष्प्रभ ठरले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी सचिन अहिर यांच्या खांद्यावर आलीय. 

मुंबईत राष्ट्रवादीकडे एकही आमदार किंवा खासदार नाही. नगरसेवकही अवघे १८... त्यामुळे ताकद वाढवायची असेल, तर जनतेत मिसळणारा चेहरा ही राष्ट्रवादीसाठी काळाची गरज बनलीय. सचिन अहिर यांच्यात पवारांनी हाच गुण बघितला असावा.

स्थापनेपासून आतापर्यंत राष्ट्रवादीला मुंबईत आपले पाय रोवता आलेले नाही. अहिर यांच्या नेतृत्वात पराभवानंतर आलेली मरगळ दूर होईल अशी वरिष्ठांना आशा आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.