रस्ते घोटाळा प्रकरणी २ पालिका अधिकाऱ्यांना अटक

मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी, दोन पालिका अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. उदय मुरुडकर, अशोक पवार अशी अटक केलेल्या अधिका-यांची नावं आहेत. त्यांना याआधीच निलंबित करण्यात आलं होतं. 

Updated: Jul 7, 2016, 12:40 PM IST
रस्ते घोटाळा प्रकरणी २ पालिका अधिकाऱ्यांना अटक title=

मुंबई : मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी, दोन पालिका अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. उदय मुरुडकर, अशोक पवार अशी अटक केलेल्या अधिका-यांची नावं आहेत. त्यांना याआधीच निलंबित करण्यात आलं होतं. 

दुपारी अडीच वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रस्ते घोटाळा प्रकऱणी अद्याप पालिका अधिका-यांवर कारवाई का केली जात नाही अशी विचारणा लोकायुक्तांनी पोलिसांना केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

त्यामुळे मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता चोवीस झाली आहे. मात्र पालिका अधिका-यांना अटक ही घोटाळा प्रकरणातली महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.