मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.
सेव्हिंग्ज अकाऊंटवरून फक्त २४ हजार रूपये आठवड्याला काढण्याची मर्यादा कायम ठेवली असताना, दुसरीकडे करंट अकाऊंट धारकांना दिलासा देण्यात आला आहे. कारण करंट अकाऊंटमघून व्यापाऱ्यांना कितीही पैसे काढता येणार आहेत.
१ फेब्रुवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यापूर्वी करंट अकाऊंटमधून १ लाख रूपये काढता येत होते.