कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा बलात्कार

कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. मानखुर्दच्या सुधारगृहात ही धक्कादायक बाब समोर आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 24, 2014, 08:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. मानखुर्दच्या सुधारगृहात ही धक्कादायक बाब समोर आलीय.
यापूर्वीही कवडास सुधारगृहातील गतिमंद मुलींवर तिथल्या लोकांनी तीन वर्षे बलात्कार केला होता. आता मानखुर्दमध्येही गेल्या चार महिन्यांपासून तिथला शिपाई या मुलींवर बलात्कार करत असल्याची संतापजनक घटना उघड झालीय. टीआयएसएस या संस्थेनं एक जनजागृती कार्यक्रम घेतला होता त्यावेळी या मुलींनी त्यांच्यावर घडत असलेला हा प्रकार सांगितला.
कवडास प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपींना जन्मठेप सुनावली. आता पुन्हा एकदा अंगावर शहारे आणणारी ही घटना घडलीय. शक्तीमिल इथं झालेल्या गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपींना नुकतीच जन्मठेप सुनावली असली तरीही बलात्काराचे हे घृणास्पद प्रकार सुरूच आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.