भास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेलीय - कदम

आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.

Updated: May 30, 2013, 02:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. त्यांच्या या टिकेला उत्तर देताना, शिवसेना नेते, रामदास कदम यांनीदेखील भास्कर जाधव यांच्यावर तोफ डागली आहे..
‘भास्कर जाधवांनी स्वत:चं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. आपण कोणामुळे आमदार झालो, महाराष्ट्रात कोणामुळे ओळख झाली, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे, आता घोडामैदान लांब नाही, निवडणुकांमध्ये दिसून येईल.’ ‘येत्या निवडणुकामंध्ये काय होईल याची जाणीव त्यांना नाही, तेथील लोकं त्यांना जमिनींवर आणतील. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. आदित्य ठाकरे वासरू आहेत की, वाघाचे पिल्लू आहेत हे त्यांना येत्या निवडणुकीत कळेलच. त्यांच्या डोक्यात गेलेली आहे ती हवा लवकरच उतरेल ना, पण ज्या शिवसेनेने मोठं केलं आहे, त्या बाळासाहेबांच्या नातूबद्दल असं बोलणं किंवा उद्धव ठाकरेंबाबत असं बोलणं म्हणजे खरं तर पाप आहे.’
‘भास्कर जाधव अजित पवारांना दाखवतायेत, की बघा मी किती मोठं काम केलं आहे. एका तालुका प्रमुखाला राष्ट्रवादी मध्ये आणलं. पण त्यांना आता कळेलच की, त्या तालुका प्रमुखाची किती किंमत आहे ते देखील लवकरच समजेल.’ ‘अजित पवार ७० हजार कोटी घोटाळ्याची चौकशी झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये येणार होते. मात्र चौकशी राहिली बाजूला, बिनखात्याचे मंत्री म्हणून मागच्या दरवाज्याने मंत्रिमंडळात आले. यापुढे आमचा एककलमी असणार आहे की, भास्कर जाधवांना भुसपाट करू.’
रामदास कदम यांनी दिलेल्या उत्तराला आता रामदास कदम काय उत्तर देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे भास्कर जाधवांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.