सीएमचा एक कॉल आणि आठवले विमानतळावरुन माघारी

कोपर्डी बलात्कार प्रकरणी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले कोपर्डी दौऱ्यावर निघाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका कॉलमुळे त्यांना विमानतळावरुन माघारी परतावे लागले.

Updated: Jul 23, 2016, 12:00 PM IST
सीएमचा एक कॉल आणि आठवले विमानतळावरुन माघारी title=

मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले कोपर्डी दौऱ्यावर निघाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका कॉलमुळे त्यांना विमानतळावरुन माघारी परतावे लागले.

कोपर्डीतील पिडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आठवले निघाले होते. विमानतळावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवलेंना कॉल केला. आणि कोपर्डीला जाऊ नये असे सांगितले. 

पीडित मुलीच्या कुटुंबियांना दुसऱ्या स्थळी नेण्यात आले असून तुम्ही कोपर्डीला जाऊ नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे आठवले विमानतळवरुन माघारी परतले.