उदयनराजे! RPI कडून निवडणूक लढा- आठवले

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणूक आरपीआयकडून लढवावी, असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 23, 2013, 07:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणूक आरपीआयकडून लढवावी, असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी भेट घेतली होती. तेव्हा त्यांना ही सूचना केली होती, असंही आठवले म्हणाले. उदयनराजे पुढील लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढणार नसल्याचा दावाही आठवलेंनी केला.
आंबेडकरी जनतेनं नक्षलवादी चळवळीचा मार्ग धरु नये, असं आवाहन रामदास आठवलेंनी यावेळी केलं. नक्षलवादापासून दूर राहाण्याचा सल्ला रामदास आठवलेंनी दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.