मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे

राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Updated: Apr 10, 2015, 07:34 PM IST
मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे  title=

मुंबई : राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

सध्या ज्या टोल नाक्यांवर वसुली केली जाते त्यात पारदर्शकता नसल्याचेही मत राज ठाकरे यांनी व्यकत केले. टोल नाक्यावरील कॅश पेमेंट बंद करायला हवे. मी 
जगभरात फिरलो त्या ठिकाणी कॅश पेमेंट होत नाही. मग अशी यंत्रणा आपल्याकडे का होत नाही. त्यामुळे यांच्या हेतूवर संशय निर्माण होतो. 

मागील सरकारने अशा पद्धतीने टोल निर्माण केले ते आता बंद करता येत नाही, यावर राज ठाकरे म्हणाले, जाहीरनाम्यात टोलमुक्त होऊ अशी आश्वासन का दिले. आश्वासन दिले तर ते आता पाळायला हवे.  

मुंबईच्या एन्ट्रीला टोल लावले, पण ते वसूल करताना कॅश पेमेंट बंद केले पाहीजे. टोल नाक्यावर बाऊंन्सर ठेवतात. हे काही लोकशाही राज्याचे लक्षण आहे.  आमदारांशी बाचाबाची झाली तेव्हा बातमी.. सामान्यांला दररोज त्रास होतो. त्यावर कोणी काही बोलत नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. 

सरकारची धोरणं माझ्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे ठरत आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात या गोष्टी नव्हत्या, असे राज ठाकरे यांनी सांगितले.  

टोलसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कोर्टात तारीख मिळणार नाही, शिवाजी पार्कवर भाषण व्हायचे की नाही यावर कोर्टाची तारीख मिळते. आता कोर्टाबद्दल काय बोलायचे, असा उद्विगन् सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

सरकार बदलल्यानंतर नव्या सरकारने डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल तपासणी व्हायला हवी होती. मागील सरकारचा डीपी प्लॅन तपासून घेणे नव्या सरकारचे काम आहे. आता सर्वत्र टीका झाल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी समिती नेमण्यात येते आहे, यावरही त्यांनी ताशेरे ओढले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.