मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली.
राज ठाकरेंनी पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणे टाळले होते.
मात्र यावर्षी ते स्मृतीस्थळावर आवर्जुन गेल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच राज ठाकरेंनी हजेरी लावल्यामुळं उद्धव आणि राज ठाकरे साथसाथ दिसले. यानिमित्तानं राजकारणापेक्षा रक्ताची नातीच घट्ट असतात याचाच प्रत्यय आला. तर दुसरीकडे राज्यातल्या राजकारणातही ठाकरे बंधू साथसाथ येणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलीय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.