पुढील २ दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

पुढील दोन तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे. 

Updated: Jun 6, 2016, 04:55 PM IST
पुढील २ दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस title=

मुंबई : पुढील दोन तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे. 

मुंबईतही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर नेमका कसा आणि किती दिवसात कोकणात आणि मुंबईत दाखल होईल हे सांगण अधिक संयुक्तिक ठरेल असेही कुलाबा वेधशाळेच्यावतीने सांगितलयं. तुर्तास महाराष्ट्रात तापमानाचा पारा हळूहळू खाली येईल. दरम्यान मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहेत. तसंच महाराष्ट्रात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसही पडतोय.