मेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 32 किमीच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत.

Updated: Jun 3, 2016, 11:20 PM IST
मेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी title=

मुंबई : वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 32 किमीच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत.

14,549 कोटी रूपये खर्च या प्रकल्पाला येणार आहे. 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. आता राज्य सरकारला हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. भक्ती पार्कमधून सुरू होणाऱ्या या मेट्रो मार्गाचं अखेरचं स्टेशन कासारवडवली येथे असेल. तक ओवळा इथ कार डेपोसाठी 30 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे.