दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 20, 2013, 10:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय. महागाईचा आगडोंब उसळला असताना सर्वसामान्यच्या खिशाला यामुळे चांगलीच झळ बसतेय.
रेल्वेच्या आरक्षणावर संपूर्णतः एजंटांचा ताबा असल्याने सर्वसामान्यांना सध्या बस सेवेशिवाय पर्याय नाही. त्यातच एसटीची सेवाही काहीशी अपूर्णच... त्यामुळेच नागपूर, वर्धा किंवा नाशिकमधून राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत असो किंवा मध्यप्रदेश गुजरातमध्ये जाणे असो खाजगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच सध्या ट्रॅव्हल्स कंपन्या दुप्पट दराने भाडे आकारणी करत आहेत. उन्हाळी ख्रिसमस आणि आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये हे दर दुप्पट करण्यात आले आहेत. जलदगतीने पोहोचण्यासाठी चाकरमान्यांचे यात सर्वाधिक हाल होत आहेत. गरज लक्षात घेऊन आणि अडचणीप्रमाणे हे दर ठरविले जात असल्याने प्रवासी अधिकच हवालदिल झालेत.
उच्च न्यायालयाने परीवहन विभागाला गेल्या वर्षी खाजगी ट्रॅव्हल्स सेवेचे दर निर्धारित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप शासन याकडे लक्ष देत नाही. कंपनी चालक मात्र आमचे दर हे योग्यच असल्याचा दावा करत आमची सर्व्हिस कशी चांगली याचं प्रवचन देण्यावरच भर देत आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशिर्वादाने दिवाळीत मध्यमवर्गीय प्रवाश्यांची ही लूट होत आहे. ही मिलीभगत उघड करून सर्वच प्रवाश्यांनी याला विरोध नोंदवून तक्रार करण्याची गरज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.