पंतप्रधान मोदींचा आडवाणी होऊ नये - शिवसेना

भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचं उदाहरण देत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर टीकेचा बाण सोडला आहे. अचानक लाहोरला गेल्यामुळे मोदींवर टीका करत पाकिस्तानच्या जवळ जाणाऱ्या नेत्यांचं राजकारण लयास जातं असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

Updated: Dec 28, 2015, 05:16 PM IST
पंतप्रधान मोदींचा आडवाणी होऊ नये - शिवसेना title=

मुंबई : भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचं उदाहरण देत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर टीकेचा बाण सोडला आहे. अचानक लाहोरला गेल्यामुळे मोदींवर टीका करत पाकिस्तानच्या जवळ जाणाऱ्या नेत्यांचं राजकारण लयास जातं असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

काँग्रेसचे पंतप्रधान जर अचानक लाहोरमध्ये उतरले असते तर भाजपने त्या कृतीचं जंगी स्वागत केलं असतं का असाही सवाल 'सामना'तून विचारण्यात आला आहे. 

'पाकिस्तानची भूमी ही शापित आहे. त्या शापित भूमीशी चुंबाचुंबी करणं महाग पडतं. लाखो निरपराध्यांचे रक्त त्या भूमीत झिरपले आहे' असंही सामनातून म्हटलंय. 

पंतप्रधान मोदी कमालीचे धाडसी आहेत. म्हणून ते अचानक लाहोरमध्ये घुसले. असं म्हणत सामनातून मोदींचं कौतूक करण्यात आलं पण मोदींना धोका राजकारणात धोका निर्माण होऊ नये अशीही प्रार्थना सामनातून करण्यात आली.